परिस्थिती
किती खोल शब्द आहे परिस्थिती !
लहानपणापासून मी ऐकत आलो आणि समजत आलो की ज्यांना स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असते तेच यशस्वी होतात. ती जाणीव सगळ्यांना असते का ?
असं वाटत आहे की या परिस्थिती शीच माझा मोठा संबंध आहे . चुकतोय मी , स्वतःला जास्त मोठा समजून माझे डोळे या चमचमणाऱ्या जगासमोर दिपून गेले आहेत.
विसरलो का बापाचं कष्ट , किती कष्ट करावे लागतात त्यांना , जे वय माझं त्यांना कामात खांदा देण्याचं आहे त्यातच मी त्यांना खांदा देण्या ऐवजी त्यांना त्रास देत आहेस.हेच ते कारण आहे ज्यामुळे माझी प्रगती खुंटली आहे. कशाचा राग धरतोय मनात , कशाचा अभिमान झालाय तुला ?
एकांतात खुप ज्ञाण्यांसारखा स्वतःच्याच मनात बडबड करत बसतोस , ज्ञानाच्या एवढ्या गप्पा मारतोस पण स्वतःच्या जीवनात त्या ज्ञानाला उतरूच देत नाहीस .
असल्या ज्ञानाचा काय फायदा ?
'आलिया भोगासी असावे सादर ' मी लक्षात ठेवायला पाहिजे , आपन या देहात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे या देहाशी असलेले नाते आणि ऋण आपल्याल फेडलेच पाहिजे. मंदिरातल्या देवांना काय शोधत बसलो मी , माझ्या घरातले विट्ठल रखुमाई दुःखी असताना.....
इतके दिवस मी किती किती वाईट वागलो माझ्या बाबा आणि आईसोबत....
याची खंत वाटत आहे मला....
या ' परिस्थिती' नावाची जानिव मला झाली नाही याचं कारण आहे , ते म्हणजे माझ्या बाबांनी त्याची कधी जाणीवही होऊन दिली नाही , मला सतत जे पाहिजे ते पुरवीत राहिले माझे बाबा , आणि मी मूर्ख त्यांनाच राग राग करत होतो ....
खरं आहे - रामायणात जेव्हा युध्दाचा प्रसंग येतो तेव्हाची गोष्ट खूप सहाय्यक ठरते. इंद्रजीत ला माहीत असते की श्री राम हेच परमात्मा आहे आणि त्याची आई सुद्धा त्याला म्हणते की तू श्री रमांना शरण जा पण त्यावेळी जे इंद्रजीत बोलतो ते सोन्यात बसवलेल्या हिऱ्या इतकं मौल्यवान आहे.
तो म्हणतो ," हो हे खरं आहे की श्री रामच परमात्मा आहेत आणि त्यांची विजय निश्चित आहे पण यावेळी माझं कर्तव्य आहे की माझा बाप रणांगणात सगळ्या बाजूंनी शत्रूंनी घेरला गेलेला आहे आणि मी त्यात त्यांची रक्षा करावी , भित्र्यासारख पळून ना जावं , हेच माझं धर्म आहे पुत्रधर्म , पुत्राच एकच कर्तव्य आहे की बापाची सेवा करणं.
जे वडिलांचा अपमान करतात त्यांचा सन्मान देवता सुद्धा करत नाहीत . मी जर माझ्या पित्याला या रणांगणात एकटा सोडून शत्रूला जाऊन मिळू तर श्री राम सुद्धा मला शरणागती देणार नाही...
म्हणून हे माते , मला तसं करण्यास सांगू नको."
बस... आता नाही जायचं परत त्या अंधकारात ,नाही जायचं परत त्या मृत्यूच्या जबड्यात ,आता पुढं जायचं .
इतके दिवस मी किती मुर्खासारख फिरत होतो माझ्या आयुष्याच्या प्रश्नांचे उत्तर सापडीत , पूर्ण मूर्ख होऊन.
बाबा मला माफ करा....
मी इतक्या दिवस ज्याला खरा आणि सत्य मानत होतो ते तर सगळ्यात मोठा जाळ होता ज्यात मी चांगलच फसलो होतो.
परत नाही पडणार त्या जाळ्यात , नको ते दरिद्री जीवन.
माझे बाबा माझ्यासाठी खूप कष्ट करतात आणि त्यांच्या कष्टाला सिद्ध करण्यासाठी मला थोडे कष्ट करायला काहीच हरकत नाही. आज खरी ज्ञानेश्वरी कळली आज खर आत्मबोध झाला आज खरं ज्ञान मिळालं आज माझे डोळे उघडले आज मी सुरुवात करणार ,आजपासून परत नाही थांबणार.आज मला माझं ध्येय कळालं .
माझं ध्येय जीवनात काही मोठं कार्य करणं उरलच नाही.माझ्या वडिलांनी माझ्यासमोर अगोदरच ते प्रस्तुत केलं आहे त्या मार्गवर मला फक्त चालायच आहे , काहीही हो .
हीच खरी भगवद् गीता , हाच आपला धर्म हेच आपले सुख हीच आपली पंढरी , आपले आई बाबाच आपले विठ्ठल रखुमाई , हेच आपले सौभाग्य , सगळं काही हेच .
' शोधिसी मानवा राउळी मंदिरी , नांदतो देव हा अपुल्या घरी.'
तुझ आहे तुजपाशी का रे वाट चुकलासी ?
मृगास आज या कस्तुरीचा भान आले.
एकटा चालतोय , स्वच्छंद ?
ऐक , आई बापाला नाकारून चाललास
मिळेल यश मिळेल कीर्ती मिळेल सर्वकाही
पण ना मिळू शकेल बापाची शाबासकी
त्यांच्या भावनांना सुध्दा कधी ऐक , न बोलताच त्यांचे चेहरे कीती बोलून जातात .
आपलं ध्येय एकच , आपल्या बापाला समाजात सन्मानाच स्थान !
I became matured not by my age ,not by the wisdom tooth , not by my achievement . The truth is today I have become matured truly after realising that I am the one who is going to provide a platform to my father in the society to put his wisdom infront of the world. And when this goal is completed I will be won already.
I am the one going to change the scenario of my family and take everyone to the next level.I am the one to surprise everyone with the abrupt success I am goin to bring.
Hara Hara Mahadeva 🔥
Jai maay bhawani
Jai shree Ram 🩸.